सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू 16 फेब्रुवारी रोजी माहूर आणि सारखनी येथे उपस्थित राहणार

Aarchi Rinku Rajguru Mahur Sarkhani


साडे तीन शक्ती पिठा पैकी पूर्ण पिठ असलेल्या  रेणूका देवीच्या माहूर गडावर दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू दर्शनासाठी हेलिकॉप्टर मधून येणार दर्शन घेतल्यानंतर म्हणजेच दर्शना नंतर परत त्या सारखनी येथे बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेत जाणार आहे. अशी माहिती आमदार निवास चित्रपटाचे निर्माते संजीव कुमार यांनी दिली.


रिंकू राजगुरू - संजीव कुमार

मित्रांनो प्रत्येक वर्षी सारखनी येथे जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे विशाल जाधव यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. हि स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर उपलब्ध असते. त्यामुळे या स्पर्धेमध्ये राज्यभरामधून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्या मुळेच या स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप म्हणून आमदार निवास चित्रपटाचे निर्माते संजीव कुमार यांनी सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. आणि रिंकू राजगुरू यांनी या निमंत्रणासाठी होकार दिला आहे. 16 फेब्रुवारी ला आर्ची अर्थात रिंकू राजगुरू अकलूज येथून हेलिकॉप्टरने प्रथम माहूर येथे दर्शनासाठी आणी नंतर सारखनी येथे बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.


वाचा➡️माहूर रेणुका देवी - माहूर गडाची माहिती


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने