Realme X7 आणि Realme X7 Pro हे 5G स्मार्टफोन भारतात लाँच


Realme X7 Pro

Realme कंपनीने आपले नवीन X सीरीज मधले दोन जबरदस्त स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro भारतात लाँच केले आहे. हे स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि Realme.com वर उपलबध असणार आहेत. रियलमी X7 हा स्मार्टफोन (6 जीबी रैम+128 जीबी इंटर्नल स्टोरेज) आणि (8 जीबी रैम+128 जीबी इंटर्नल स्टोरेज) मध्ये सादर केला आहे. जर आपण रियलमी X7 प्रो बद्दल बोललो तर हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंट (8 जीबी रैम+128 जीबी इंटर्नल स्टोरेज) मध्ये सादर केला आहे.


Realme X7 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

हा स्मार्टफोन Nebula आणि Space silver या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.

Realme X7 मध्ये 6.43 इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे resolution 2400x1080 पिक्सेल्स आहे.

या फोन मध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. आणि हा फोन मिडियाटेक Dimensity 800U चिपसेट बरोबर कार्य करतो.

6 जीबी रॅम + 128 जीबी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबीचं इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलं आहे


Realme X7


हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो.

स्मार्टफोनला 4310mah ची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5 जी सेवा देण्यात आली आहे.

फोन चे डायमेंशन 160.9 x 74.4 x 8.3mm आणि वजन 179 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये ट्रीपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सल मायक्रो कैमरा देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X7 हा फोन दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.


Realme X7 Pro स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स


हा स्मार्टफोन Fantasy आणि Mystic Black या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.

Realme X7 Pro मध्ये 6.55 इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे resolution 2400x1080 पिक्सेल्स आहे.

या फोन मध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. आणि हा फोन मिडियाटेक Dimensity 1000 प्लस चिपसेट बरोबर कार्य करतो.

हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंट मध्ये देण्यात आला आहे. 8 जीबी रॅम + 128 जीबी इनबिल्ड स्टोरेज

हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो.


हे वाचा➡️6000 MAh बॅटरी सोबत Redmi 9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


स्मार्टफोनला 4500mah ची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5 जी सेवा देण्यात आली आहे.

फोन चे डायमेंशन 160.83 x 75.18 x 8.51mm आणि वजन 183.7 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सल मायक्रो आणि 2 मेगापिक्सल मोनो क्वाड कैमरा देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X7 Pro हा फोन सिंगल व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात या फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.


Realme X7 Pro ची सेल 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि Realme X7 ची सेल 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. दोन्ही डिव्हाइस Realme.com आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येतील. लॉन्च ऑफरअंतर्गत कंपनी काही खास ऑफरमध्ये हा फोन खरेदी करण्याची संधी देईल. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डसह खरेदी केल्यास त्वरित 2 हजार रुपयांची सूट मिळेल. जर आपण ऐक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केले तर आपल्याला 1500 रुपयांची सूट मिळेल.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने