6000 MAh बॅटरी सोबत Redmi 9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi 9 Power स्मार्टफोन भारतात लॉन्च


Redmi 9 Power

Mi ने आपला नवीन स्मार्टफोन Redmi 9 Power भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, Amazone आणि Mi store वर उपलब्ध असणार आहे. Mi Redmi कंपनीने हा स्मार्टफोन Mighty Black, Blazing Blue, Fiery Red आणि Electric Green या चार कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे. तर चला जाणून घेऊया Redmi 9 Power या स्मार्टफोन विषयी सर्व माहिती... 


Redmi 9 Power कलर

Redmi 9 Power स्मार्टफोन स्पेसिफिकेशन आणि फीचर्स | Redmi 9 Power specifications - features in marathi


Redmi 9 Power मध्ये 6.53 इंचाचा फूल एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे resolution 2340x1080 पिक्सेल्स आहे. फोन मध्ये 19.5.9 Aspect Ratio मिळतो.

या फोन मध्ये क्वाकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. आणि फोन चा GPU अ‍ॅड्रेनो 610 देण्यात आला आहे.

4 जीबी रॅम + 64 जीबी आणि 4 जीबी रॅम + 128 जीबीचं इनबिल्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्याचे स्टोरेज आपण मायक्रोएसडी कार्ड वापरुन 512 जीबी पर्यंत वाढवू शकतो.

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.


हे वाचा➡️Realme X7 आणि Realme X7 Pro हे 5G स्मार्टफोन भारतात लाँच - जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Redmi 9 Power हा फोन अँड्रॉयड 10 वर कार्य करतो. आणि हा फोन मीयुआय 12 सोबत येतो.

स्मार्टफोनला 6000mah ची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. आणि हा फोन 18 वॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4 जी, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 2.4G/5G, टाइप-सी पोर्ट, जीपीएस, WiFi डिस्प्ले, 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

फोन चे डायमेंशन 162.3 x 77.3 x 9.06mm आणि वजन 198 ग्रॅम आहे.

फोटोग्राफी करण्यासाठी या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंन्स कैमरा, 2 मेगापिक्सल depth कैमरा आणि 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच Redmi 9 Power स्मार्टफोन मध्ये IR Blaster senser देण्यात आला आहे. ज्याचा वापर आपण remote प्रमाणे करू शकतो.

फोन च्या साऊंड सिस्टम बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये Stereo Speakers देण्यात आले आहेत.


Redmi 9 Power स्मार्टफोन चि किंमत | Redmi 9 Power price in India


Redmi 9 Power हा फोन दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.

हा फोन फ्लिपकार्ट, Amazone आणि Mi store वर उपलब्ध असणार आहे. या फोन चि Next sale ही 29 डिसेंबर ला दुपारी 12 वाजता सुरू होईल.


हे वाचा

➡️धमाकेदार फीचर्स घेऊन infinix zero 8i स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने