Mi Air Charge शाओमीची नवीन टेक्नॉलॉजी - फोन ला हात न लावता फोन चार्ज


Mi Air Charge
Credit - blog.mi.com

शाओमीने आपले नवीन वायरलेस चार्जर सादर केले आहे ज्याचे नाव आहे Mi Air Charge. हे चार्जर जगातील पहिले वायरलेस चार्जर आहे. हे एक रिमोट चार्जिंग तंत्रज्ञान आहे जे हवेमध्ये डिव्हाइस ला चार्ज करते. हि टेक्नॉलॉजीद्वारे लोकं कितीही लांब बसून आपले डिव्हाइस चार्ज करू शकतील.

Mi Air Charge ने आपण कोणत्याही डिव्हाइस ला केबलशिवाय आणि वायरलेस चार्जिंग स्टँडशिवाय चार्ज करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ना वायर, ना स्टँड कोठेही बसून मोबाईल चार्ज करू शकतो.

Mi Air Charge
Credit - blog.mi.com

हे एक खरोखर वायरलेस चार्जर आहे या वायरलेस चार्जर ने आपण फोन, टॅब्लेट आणि कोणत्याही वायरलेस चार्जिंग डिव्हाइस ला चार्ज करू शकतो.

सध्या हे तंत्रज्ञान संकल्पना (Concept) साठी तयार केले आहे. अद्याप शाओमीने या चार्जरच्या उपलब्ध ते बाबत कोणतीही माहिती दिली नाही. 

Mi Air Charge
Credit - blog.mi.com

या वायरलेस चार्जर च्या मदतीने एकाच वेळी अनेक डिव्हाइस ला 5 वॅट्स च्या क्षमतेसह चार्ज केले जाऊ शकते. भविष्यात या चार्जर चा उपयोग ऑफिस, सार्वजनिक ठिकाण, किंवा Airports सारख्या जागी केला जाऊ शकतो. शाओमीने हे तंत्रज्ञान स्वतः विकसित केले आहे. या चार्जरची रचना एखाद्या आयताकृती बॉक्स सारखी आहे ज्यात डिस्प्ले देखील आहे. या डिस्प्लेमध्ये बॅटरी लेवल आणि चार्जिंग स्टेटस दिसेल. 

Mi Air Charge कसा कार्य करतो? 

मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, हा Mi Air Charge वायरलेस चार्जर कशाप्रकारे कार्य करतो? तर Mi Air Charge मध्ये 144 एंटीना दिले आहेत जे मिलीमिटर वाइड वेब प्रसारित करतात. या वेबद्वारे फोन बिमफाॅर्मिग चार्ज केला जातो. फोन चे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी या चार्जरमध्ये 5 एंटीना दिले आहे. सिग्नल ला Rectifier Circuit द्वारे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केले जाईल. 

सध्या कंपनीने हे तंत्रज्ञान सादर केले नाही. हे तंत्रज्ञान संकल्पना (Concept) साठी तयार केले आहे. शाओमीने सोशल मीडिया द्वारे या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली आहे. शाओमीने टिझरद्वारे सांगितले आहे की Mi Air Charge हे तंत्रज्ञान स्मार्टवाॅच, फिटनेस बॅन्ड अशाप्रकारचे डिव्हाइस अनुकूल असतील असं कंपनीनं म्हटलं आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने