Aadhar card information in marathi आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हे आपल्या जिवनाचे महत्वाचे ओळखपत्र डॉक्युमेंट बनले आहे. सरकारने दिलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मित्रांनो जर काही कारणास्तव आपले आधार कार्ड हरवले असेल, खराब झाले असेल किंवा कोठे विसरून राहिले असेल तर त्यामुळे आपल्याला बराच प्रॉब्लेम होतो. हा प्रॉब्लेम रोखण्यासाठी आपण आपले आधार कार्ड आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये सहजरित्या डाऊनलोड करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आधार कार्ड डाऊनलोड कसे करायचे?
मोबाइलमध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे?
प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण आपल्या मोबाईल मध्ये आधार कार्ड डाऊनलोड (Aadhar Card Download) केले तर आपले आधार कार्ड नेहमी आपल्या सोबत राहील.
Note: आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असले आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला आधार कार्ड डाऊनलोड करता येणार नाही.
आपण तीन प्रकारे आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो.
1. आधार नंबर
2. एनरोलमेंट आईडी
3. वर्चुअल आईडी
आधार नंबरद्वारे आधार कार्ड असे डाउनलोड करा.
सर्वप्रथम यूआईडीएआई चि अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ उघडा >> वेबसाइट उघडल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या तीन बिंदू वर क्लिक करा >> आणि Desktop Site निवडा.
आता Download Aadhaar ऑप्शन वर क्लिक करा >>
कैप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
आता तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल तो OTP आपल्याला ईथे टाकायचा आहे >> OTP टाकल्यानंतर Did you know that you can order Reprint of Aadhaar letter from UIDAI website? या ऑप्शन मध्ये Yes हे ऑप्शन निवडा >>
In how many days did you receive the Reprinted Aadhaar Letter after getting SMS from India Post? या ऑप्शन मध्ये Not Ordered हे ऑप्शन निवडा. >> आणि Verify And Download वर क्लिक करा.
आपण हे ई-आधार कार्ड डिजिटल स्वरुपात जतन करू शकतो आणि या कार्डची प्रिंट पण काढू शकतो.
एनरोलमेंट आईडीद्वारे आधार कार्ड असे डाउनलोड करा.
यूआईडीएआई चि अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ उघडा >> वेबसाइट उघडल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या तीन बिंदू वर क्लिक करा >> आणि Desktop Site निवडा.
Download Aadhaar ऑप्शन वर क्लिक करा.
I have सेक्शन मध्ये Enrolment ID (EID) सिलेक्ट करा. एनरोलमेंट आईडी सिलेक्ट केल्यानंतर तुमची 14 अंकी एनरोलमेंट आईडी टाका.आणि Enrolment ID च्या खाली स्लिप वर असलेली तारीख आणि वेळ टाका.
कैप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
OTP टाका आणि Verify And Download वर क्लिक करा.
वर्चुअल आईडीद्वारे आधार कार्ड असे डाउनलोड करा.
यूआईडीएआई चि अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ उघडा >> वेबसाइट उघडल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या तीन बिंदू वर क्लिक करा >> आणि Desktop Site निवडा.
Download Aadhaar ऑप्शन वर क्लिक करा.
I have सेक्शन मध्ये Virtual ID (VID) सिलेक्ट करा. वर्चुअल आईडी सिलेक्ट केल्यानंतर तुमची 16 अंकी वर्चुअल आईडी टाका.
कैप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
OTP टाका आणि Verify And Download वर क्लिक करा.
युनिक आयडेंटिफिकेशन नंबरने (यूआयडी) स्पष्टपणे म्हटले आहे की डाउनलोड केलेले आधार कार्ड सुरक्षित आहे आणि प्रिंट केलेल्या आधार कार्ड प्रमाणेच त्याचे मूल्य आहे.
मला आशा आहे की, आपल्याला मोबाइलमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करायचे? Aadhar card information in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻