TalkBack काय आहे...?What is Talkback?

मित्रांनो मोबाईल फोन मध्ये असे अनेक फिचर्स आहेत. त्या बद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते... पण असेच एक महत्त्वाचे फीचर्स आहे ते म्हणजे talkback. हे फिचर्स सर्वच Android फोन मध्ये सहज उपलब्ध असते. तर आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत की, TalkBack म्हणजे काय? ते कश्यासाठी वापरतात? त्याचा उपयोग काय आहे? आणि TalkBack चालू आणि बंद कसे करावे...? 

Talkback

TalkBack काय आहे? What is Talkback in marathi

कोणत्याही Android phone मध्ये  Talkback हे accessibility setting मध्ये उपलब्ध असते. हे फिचर्स खास करुन अंध/blind किंवा ज्यांना कमी दिसते अश्या लोकांसाठी तयार केले आहे. अश्या लोकांना Android फोन use करायचा आहे तर ते सहजपणे हा पर्याय वापरून मोबाईल use करू शकतात. या पर्यायाच्या मदतीने वापरकर्त्यांना मोबाईल बोलून सांगेल की हे ऑप्शन उघडण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तसेच तुम्ही कोणत्याही ऑप्शन ला touch केल्यावर मोबाईल vibrate होईल ज्यामुळे माहीत होईल की, आपण कोणत्या ऑप्शन ला touch केला आहे. यामध्ये आपल्याला कोणतेही ऑप्शन ओपन करण्यासाठी डबल क्लिक करावे लागेल... 

* तर मित्रांनो TalkBack चालू आणि बंद कसे करावे हे पाहू... 

TalkBack activate करण्यासाठी  how to turn on TalkBack

सर्वप्रथम setting ओपन करा >> accessibility मध्ये जा >> TalkBack वर touch करा >> TalkBack चालू करा. 

Talkback setting

अशाप्रकारे आपण setting मध्ये जाऊन TalkBack ऑप्शन चालू करू शकतो.

आता आपण TalkBack ऑप्शन बंद कसे करायचे ते पाहू...how to turn off TalkBack

आपल्याला TalkBack ऑप्शन बंद करायचे असेल तर आपल्याला आपल्या मोबाईल चे volume up आणि volume down बटन एकाच वेळेस 3 सेकंदांपर्यंत दाबून ठेवायचे आहे. दाबून ठेवल्या नंतर अश्या प्रकारे स्क्रीन ओपन होईल... 
ओके वर डबल क्लिक केल्यावर TalkBack suspend होईल.

TalkBack ऑप्शन बंद कसे करायचे

नंतर परत वापस setting ओपन करा >> accessibility मध्ये जा >> TalkBack वर touch करा >> आणि TalkBack बंद करा. 

TalkBack ऑप्शन बंद कसे करायचे

आता आपल्या मोबाईल मधला TalkBack बंद/Deactivate झालेला आहे. 

तर या प्रकारे आपण कोणत्याही Android फोन मध्ये TalkBack ऑप्शन activate आणि deactivate करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने