मोबाईलची बॅटरी का फुगते? smartphone swollen battery in marathi


मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन प्रत्येक व्यक्तींकडे आहे. प्रत्येक व्यक्ति स्मार्टफोन वापरतो. पण आपण बर्‍याच वेळा ऐकले असेल किंवा पाहिले असेल की, आपण वापरत असलेला स्मार्टफोन काही दिवसांनी जुना झाला की, त्या मोबाईलची बॅटरी फुगते असे का होते आपल्याला माहीत आहे का? माहिती नसेल तर हि पोस्ट आपल्या साठी कारण या पोस्ट मध्ये आपण मोबाईलची बॅटरी का फुगते? smartphone swollen battery in marathi याबद्दल जाणून घेणार आहोत...


मोबाईलची बॅटरी का फुगते?


आपण मोबाईलची बॅटरी फुगलेली पाहिली असेल आणि हि फुगलेली बॅटरी ब्लास्ट झाली तर फोन चे नुकसान तर होईलच पण ज्याच्या जवळ (खिशात) हा स्मार्टफोन आहे त्याचे पण खूप नुकसान होऊ शकते.


बॅटरी ब्लास्ट

मोबाईलची बॅटरी का फुगते? smartphone swollen battery in marathi


मोबाईलची बॅटरी फुगण्याचे दोन कारण आहेत. एक गैस आणि दुसरा सॉलि़ड. जेव्हा पण मैन्यूफैक्चर बॅटरी बनवतात तेव्हा ते लेबल वर आईडेंटिफाई करतात की केमिकल रिएक्शन मुळे गैस आणि सॉलि़ड बाहेर निघणार.


जेव्हा कोणत्याही फोन चि बॅटरी जुनी होते तेव्हा त्या बॅटरी मध्ये अधिक प्रमाणात गॅस भरला जातो. मोबाइल बॅटरीमध्ये गॅस भरल्यामुळे त्याची बॅटरी फुगू लागते. बॅटरीमध्ये जितका जास्त गॅस भरला जाईल तितकी बॅटरी अधिक प्रमाणात फुगते.


आता आपण विचार करत असाल की मोबाइल बॅटरी मध्ये गॅस कुठून आला? तर कोणत्याही बॅटरीला दोन साइड असतात. एक पॉजिटीव आणि दुसरी नेगेटिव. बॅटरी च्या पॉजिटीव साइड ला एनोड (Anode) आणि बॅटरी च्या नेगेटिव साइड ला कॅथोड (Cathode) असे म्हणतात. जेव्हा आपण कोणत्याही बॅटरी ला चार्जिंग प्लग सोबत कनेक्ट करतो आणि त्यामध्ये करंट पुरविला जातो तेव्हा बॅटरीच्या दोन्ही साइड मध्ये केमिकल रिएक्शन होते.

तर याच केमिकल रिएक्शन मुळे गॅस तयार होतो.


याचा अर्थ बॅटरीच्या एनोड आणि कॅथोड साइड यांच्यामधे केमिकल रिएक्शन होते. म्हणजे जेथे कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन होते तेथे गॅस तयार होतो आणि गॅस बॅटरीच्या बाहेर निघतो. प्रत्येक बॅटरीच्या मध्ये काही मेटिरियल्स असतात आणि ते मेटिरियल्स झाकलेले असतात. जेव्हा आपण मोबाईल फोन चार्जिंग ला लावतो तेव्हा प्लग मधून करंट पास होतो यामुळे मेटिरियल्स च्या मध्ये रिएक्शन होते आणि यामुळे गॅस सोडला जातो.


बॅटरीच्या आत मध्ये मेटिरियल्स झाकलेले असतात. ज्यामुळे रिएक्टिव गैस बाहेर येत नाही. अशाप्रकारे हळूहळू गॅस भरला जातो आणि बॅटरी फुगल्या जाते.


दुसरे कारण हे आहे की, बॅटरीच्या मध्ये केमिकल रिएक्शन होते ज्यामुळे काही प्रॉडक्ट्स सॉलि़ड मटेरियल च्या रुपात बॅटरीच्या आत एकत्रित होतात. या दोन गोष्टींमुळे, बॅटरी सामान्य आकारापेक्षा जास्त फुगते.


बॅटरी चि डिजाइनच अश्या प्रकारे तयार केली जाते की, बॅटरी मधून गॅस आणि सॉलिड प्रोड्यूस नाही झाला पाहिजे. परंतु काही मालफंक्शन मुळे किंवा युजरच्या चुकीच्या वापरामुळे बॅटरी फुगते.


आपण पाहिले असेल की, लोकल कंपनीची बॅटरी लवकर फुगल्या जाते कारण बॅटरी जास्त पॉवर नी बनलेली नसते.


जर आपल्याला आपल्या फोनची बॅटरी फुगलेली दिसत असेल तर ही बॅटरी त्वरित बदला. कारण बॅटरी फुगल्यानंतर ब्लास्ट होण्याची संभावना अधिक प्रमाणात वाढते.


मला आशा आहे की, आपल्याला मोबाईलची बॅटरी का फुगते? smartphone swollen battery in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


हे पण वाचा ➡️ मोबाईल बॅटरी बद्दल काही खास माहिती जी आपल्याला माहीत असलीच पाहिजे!टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने