फेसबुक रूम काय आहे? फेसबुक रूम कशी तयार करावी?

Facebook room information in marathi

फेसबुकने एक नवीन फेसबुक मेसेंजर रूम फीचर लॉन्च केले आहे ज्यात 50 वापरकर्त्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे. तर Facebook room काय आहे आणि ते कसे तयार करावे हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.


फेसबुक रूम काय आहे?

फेसबुक रूम काय आहे? What is Facebook room in marathi? 


फेसबुकने ग्रुप व्हिडीओ चॅट करणार्‍यासाठी हे फीचर आणले आहे. मेसेंजर room कॉम्प्युटर व मोबाईल दोन्ही उपकरणांमध्ये सहजपणे काम करते. या काळामध्ये लोक सोशल नेटवर्किंग साईट चा वापर जास्त प्रमाणात करत आहेत आणि तसेच व्हिडिओ चॅट सर्व्हिसकडे जाणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हे फीचर फेसबुक कंपनीच्या मेसेंजर सेवेची विस्तारित आवृत्ती आहे आणि वापरकर्त्यांना फेसबुक अॅप किंवा मेसेंजरचा वापर करून 50 पर्यंतच्या लोकांना एकाच वेळेस व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याची परवानगी देते. म्हणजेच आपण एकाच वेळी 50 लोकांसोबत ग्रुप Video कॉल करू शकतो. तसेच लिंकद्वारे पण सहभागी होऊ शकतो. आणि यामध्ये कॉलवर कोणत्याही प्रकारच्या वेळेची मर्यादा नाही.

फेसबुकवर room तयार करणे म्हणजे काय? 

Room हे फेसबुकवरील ड्रॉप-इन व्हिडिओ चॅट फीचर आहे. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ति room create करते, तेव्हा फेसबुक न्यूज फीडमधील वापरणार्‍या लोकांना सतर्क करते किंवा वापरकर्त्यास सूचना पाठवते. लोक प्रत्यक्षात फेसबुक अॅप किंवा मेसेंजर वरून व्हिडिओ कॉल सुरू करू शकतात आणि ज्या लोकांचे फेसबुक खाते नाही त्या वापरकर्त्यांना देखील येथे invite केले जाऊ शकते. परंतु, कॉल create करण्यासाठी रूम creater उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखादा वापरकर्ता फेसबुकवर room create करतो, तेव्हा कोणाला add करावे आणि कोणाला नाही हे ते select करू शकतो. आणि न्यूज फीडमध्ये त्यांची Room कोण पाहते हेदेखील ते नियंत्रित करू शकतो. 

वापरकर्ते फोन किंवा computer वापरून फेसबुक room मध्ये सहभागी होऊ शकतात. यामध्ये 14 कॅमेरा फिल्टर आणइ चेंजेबल बँकग्राउंड यांसारख्या सुविधा आहेत. तसेच portel smart डिस्प्लेबरोबरच व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्राम यांच्यावरून डायरेक्ट room create करण्याची परवानगी फेसबुकने दिली आहे.

फेसबुक room कशी तयार करावी? How to create Facebook room in marathi? 

आपल्या फोन मध्ये फेसबुक वर room तयार करण्यासाठी आपल्याकडे फेसबुक आणि मेसेंजर application चे नवीन version असणे आवश्यक आहे. नसेल तर playstore मधून application update करून घ्यावे लागेल. एकदा आपण application install केल्यानंतर, आपण या सोप्या step ने Facebook room तयार करून use करू शकतो. 

1. आपल्या phone मध्ये मेसेंजर अॅप install करा.

2. स्क्रिनच्या खाली डाव्या बाजूला create room वर टॅप करा.

Facebook create room

3. एक room तयार करा आणि आपल्याला ज्या लोकांना सहभागी करायचे आहे त्यांना निवडा.


मित्रांनो ही पोस्ट आवडली असेल तर नक्की या पोस्ट ला share करा... 🙏🏻


➡️7 Facebook tricks & tips || important settings || in marathi

 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने