व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता पाठवू शकता मेसेज! जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर मित्रांनो तुम्हाला पण एखाद्याचा नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवायचा असेल तर आज या पोस्ट मध्ये आपण एक सोपा मार्ग पाहणार आहोत, यावरून सहजपणे आपण कोणाचाही व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवू शकतो? 

व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता मेसेज कसा करावा?

व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता मेसेज कसा करावा? Send whatsapp massege without saving Phone number in marathi 


मित्रांनो कधी कधी आपल्याला अश्या लोकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवायचा असतो ज्यांच्यासोबत आपल्याला फक्त 1 ते 2 वेळेसच contact करायचा असतो तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो नंबर contact मध्ये सेव्ह करावा लागत असतो आणि मग त्या नंबरवर आपण व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकत होतो. 

पण आता तसं नाही... 

आपल्याला एखाद्या unknown number वर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही नंबर सेव्ह न करता आपण direct आपल्या स्मार्टफोनवरून कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज पाठवू शकतो.

नंबर सेव्ह न करता व्हाट्सअॅप मेसेज असा करा... 


सर्वप्रथम आपल्याला Google Chrome हे browser ओपन करायचे आहे. नंतर Google वर ही साइट उघडायची आहे, 
https://wa.me/91(मोबाईल नंबर) - म्हणजेच ज्या व्यक्तीला massege करायचा आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ईथे टाकायचा आहे) आणि हो ईथे हे जे 91 दिसते आहे हे country code टाकायचा आहे तरच ही साइट काम करेल. 

How to do whatsapp massege without saving number ...? 


wa.me/91

जेव्हा आपण या साइट वर https://wa.me/91(मोबाईल नंबर) टाकून enter करतो तेव्हा automatically आपण व्हॉट्सअ‍ॅप मधे move होतो आणि आपण directly त्या नंबरवर मेसेज पाठवू शकतो ते पण नंबर सेव्ह न करता. 

मला आशा आहे की, आपल्याला व्हॉट्सॲप मध्ये नंबर सेव्ह न करता मेसेज कसा करावा? हे समजले असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करा.🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने