फेसबुक टूल, जे आपला मेंदू वाचू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती Facebook tool - read human brain

Facebook working on new tech that can read human brain

Facebook हे एक असे टूल विकसित करत आहे, जे मानवाचा मेंदू वाचू शकेन. या नवीन टूल च्या मदतीने फेसबुक लोकांची विचारसरणी शोधून ती कृतीत बदलू शकेल.

Facebook tool read human brain

फेसबुक तयार करत आहे एक टूल, जे आपला मेंदू वाचू शकते...

आपल्याला तर माहीतच आहे की, Facebook हे जगाचे सर्वात लोकप्रिय आणि मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आणि हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक एक असे टूल विकसित करण्यात गुंतले आहे जे मानवाचा मेंदू आणि मन वाचू शकेल. फेसबुक कंपनीतील कर्मचार्‍यांना एका खास प्रकारच्या AI टूल्सची माहिती देण्यात आली, जी मानवाचा मेंदू आणि मन वाचण्यात मदत करेल.

Facebook कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे टूल मोठ्या बातम्यांच्या लेख ला बुलेट पॉइंट्समध्ये मोडेल, जेणेकरुन वापरकर्त्यांना संपूर्ण लेख वाचण्याची गरज भासणार नाही. मानवाचा मेंदू आणि मन वाचण्यासाठी फेसबुक आर्टीफीशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करून, एक सेन्सर तयार करीत आहे जे त्यानुसार कार्य करण्यास सक्षम असेल.

BuzzFeed च्या एका अहवालानुसार फेसबुकने आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले आहे की, कंपनी एक असे टूल विकसित करीत आहे जे बातम्यांचे लेख समक्रमित करेल. जेणेकरून वापरकर्त्यांना ते वाचण्याची गरज भासणार नाही. अहवालानुसार BuzzFeed ने दावा केला आहे की फेसबुक च्या अंतर्गत बैठकीतला ऑडिओ त्यांच्याकडे आहे. हा पब्लिक नाही पण अहवालानुसार हा फेसबुक च्या काही कर्मचार्‍यांसाठी ब्रॉडकास्ट केला गेला आहे.

BuzzFeed या अहवालात असे म्हटले आहे की वर्षाच्या अखेरीस फेसबुक कर्मचार्‍यांशी झालेल्या अंतर्गत बैठकीत कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) असिस्टंट टूल टीडीएलआर (TDLR) सादर केले जे या लेखाचा सारांश तयार करू शकेल.

TDLR म्हणजे Too long didn’t read.

याचा अर्थ हे टूल मोठ्या बातम्यांच्या लेख ला बुलेट पॉइंट्समध्ये मोडेल, जेणेकरुन वापरकर्त्यांना संपूर्ण लेख वाचण्याची गरज भासणार नाही.


फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक श्रोएफर यांनी या बैठकीत होरिझन या व्हर्च्युअल रिअलिटी बेस्ड सोशल नेटवर्कबद्दलही सांगितले आहे जिथे वापरकर्ते त्यांच्या अवतारात संवाद साधू शकतील आणि हँगआउट करण्यास सक्षम असतील.

मार्च 2020 मध्ये फेसबुकने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले होते की, कंपनीला एखादे असे डिव्हाइस बनवायचे आहे जे मनाला वाचू शकेल. ब्रेन मशीन इंटरफेस संशोधन हे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना कृतीत रुपांतर करू शकते. असे म्हटले जात आहे.


मात्र फेसबुक ने या रिपोर्टनंतर अद्याप कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट जारी केलेले नाही.


हे वाचा ➡️7 Facebook tricks & tips || important settings ||

 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने