World water Day 2021 - जागतिक जल दिन का साजरा करतात?

World water Day 2021 - जागतिक जल दिन 


World water Day 2021 - जागतिक जल दिन


मित्रांनो आज संपुर्ण जगभरात जागतिक जल दिन World water Day 2021 साजरा केला जात आहे. 1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण आणि विकास परिषद (UNCED) ने जागतिक जल दिन World water Day  साजरा करण्यास सुरवात केली आणि 22 मार्च 1993 रोजी पहिला जागतिक जल दिन साजरा करण्यात आला होता.  आपल्याला हा जागतिक जल दिन साजरा करून जवळपास 28 वर्ष झाली आहेत.


आपल्याला तर माहितच आहे की, पाणी हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. पाण्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. निसर्गाने मानवासाठी पाणी हि अमूल्य भेट दिली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी, पाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि गोडवा पाण्यातील संसाधनांच्या शाक्ष्वत व्यवस्थापणाचे समर्थन करण्याचा उद्देशाने आणि हेतूने हा जागतिक जल दिन आयोजित केला जातो.


सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, जगाला पाण्याच्या  गरजेची जाणीव व्हावी या उद्देशाने संयुक्त राष्ट्राने "जागतिक जल दिन" "World water Day" साजरा करण्यात सुरूवात केली.

जागतिक जल दिन साजरा करण्याचा हेतू काय आहे?


जगातील पाणी वाचवणे किती महत्वाचे आहे. हा आपला मूलभूत स्रोत आहे. विचार करा... पाणी नसेल तर किती मोठे संकट निर्माण होईल? या साठी पाणी वाचवणे किती महत्वाचे आहे? तर याच उद्देशाने म्हणजे पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी हा जागतिक जल दिन आयोजित केला जातो.


जगात असे अनेक देश आहेत जेथे लोकांना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही आणि मग लोकांना घाणेरडे पाणी पिऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.


अशाप्रकारे जागतिक जल दिन साजरा केला जातो.


World water Day दरवर्षी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जेथे लोकांना भाषण, कविता आणि कथांद्वारे जलसंधारण आणि त्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न केले जातात.


आपल्याला माहिती आहे का?


संपूर्ण पृथ्वीवर 71% पाणी उपलब्ध आहे आणि संपूर्ण जगात केवळ 2.5% च पाणी पिण्यायोग्य आहे.

जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्यात जवळजवळ 90% पाणी असते.  जेव्हा मूल मोठे होते, तेव्हा त्यात 70% पाणी असते.  आणि जेव्हा ते मूल म्हातारे होते, त्यातील पाण्याचे प्रमाण सुमारे 50% राहते. मानवी मेंदूत 75%, हाडांमध्ये 25% आणि रक्तात 83% पाणी राहते यावरून आपल्या लक्षात येईल की पाणी असेल तरच आपले जीवन आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने