महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे - advantages and disadvantages of information technology in marathi

या आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञान एक वरदान असल्याचे सिद्ध होत आहे. आजच्या 21 व्या शतकात आपण तंत्रज्ञानाच्या आयुष्यात जगत आहोत. संपूर्ण जग माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तंत्रज्ञानाशिवाय आयुष्याची कल्पना करणे आज कठीण आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत...


महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे

महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे - advantages and disadvantages of information technology in marathi


माहिती तंत्रज्ञानाचे फायदे आणि उपयोग


तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग - माहिती तंत्रज्ञानाद्वारे सर्व शिक्षण संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. या आधुनिक युगात शिक्षण  व्यवस्था खूप चांगली विकसित झाली आहे. आता ब्लॅकबोर्डवर शिक्षक फारच कमी शिकवतात त्यांना संगणक तंत्राद्वारे मुलांना चांगले प्रशिक्षण देण्यात सक्षम केले आहे. विद्यार्थी शिकण्यासाठी इंटरनेटद्वारे महत्वपुर्ण नोट्स, पीडीएफ किंवा त्याच्या अभ्यासाचे व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकतात. महत्वाचे म्हणजे या महिती तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी इतरांच्या मदतीशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास शिकू शकतात. महिती तंत्रज्ञान हे शिक्षणासाठी एक अनमोल वरदान बनले आहे.

आज आपण काही सेकंदात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण जगात कधीही आणि कोठेही माहितीचे आदान-प्रदान करु शकतो. या तंत्रज्ञानामुळे आपण जगभर कॉल किंवा व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधू शकतो. माहिती तंत्रज्ञानाने जगभरातील लोकांना ऑनलाइन माध्यमातून संवाद साधण्याची संधी दिली आहे.  संप्रेषण तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानामुळे लोक जगभरातील विविध समस्यांविषयी जागरूक होत आहेत.


अवकाश तंत्रज्ञानात जे काही विकास झाला ते सर्व माहिती तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. आज या तंत्रज्ञानाच्या मदतीने नासा आणि इस्त्रोने अवकाशात त्यांचे उपग्रह स्थापित करण्यात यश मिळवले आहे.


आज आपण वाहतुकीच्या सोईमुळे परदेशात काय कोठेही फिरू किंवा जाऊ शकतो. हे सर्व माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. आज आपण प्रवास करण्यापूर्वी घरी बसून रेल्वे किंवा विमानाचे तिकीट बुक करू शकतो आणि नक्कीच यामुळे आपला वेळ आणि पैशाची बचत होते.


आज बऱ्याच ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवसायाने जगभर खूप चांगली प्रगती केली आहे. महिती तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारच्या व्यवसायांना फायदा झाला आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेळेची आणि पैशाची बचत होते. बऱ्याच कंपन्या त्यांचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी आणि ग्राहकांना सुविधा पुरवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान प्रणालीला वापरतात आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्या जगभरात व्यवसाय करत आहेत. या कंपन्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कॉल, ईमेल यांसारख्या सुविधा प्रदान करत आहेत. ज्यामुळे ग्राहकांचे मत जाणून घेणे खूप सोपे झाले.


वाचा

➡️महिती तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञानाचे उपयोग

➡️इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट चे फायदे व तोटे

➡️विज्ञानाचे महत्त्व निबंध


कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस आणि सुधारण्यात तंत्रज्ञानाचे खूप योगदान आहे. आज तंत्रज्ञानामुळे बर्‍याच उद्योग, कंपन्या कार्यरत आहेत, जे बर्‍याच लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत, त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनत आहेत.  तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच नवीन रोजगारही विकसित होत आहेत.


महिती तंत्रज्ञानामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे माणसासारखी सर्व कामे करु शकणारी स्मार्ट मशिन्स विकसित झाले आहे.


ऑटोमोबाईल क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान खुप मोठे आहे. कारण या क्षेत्रात रोबोट किंवा ॲटोमॅटिक मशीन तयार करणे आणि त्या रोबोट किंवा ॲटोमॅटिक मशीन चा उपयोग कार्य करण्यासाठी केला जातो. रोबोट हे कोणतेही कार्य वेगाने करू शकतो. म्हणून या तंत्रज्ञानामुळे अवजड काम करणे सोपे झाले आहे.


आपल्या मनोरंजनासाठी तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे. आजच्या युगात आपल्याकडे बरेच साधन आहेत. ज्यांचा वापर आपण आपल्या मनोरंजनासाठी करत असतो.


वैद्यकीय क्षेत्रात महिती तंत्रज्ञानाने बऱ्याच मशीन्स तयार केल्या आहेत. आज अशी अनेक वैद्यकीय मशीन्स आहेत ज्यांच्यासाठी विविध आरोग्याच्या समस्या सहजपणे शोधल्या जाऊ शकतात. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जटिल ते जटिल ऑपरेशन सुलभ केले जात आहे.  वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या किंवा रोगांची तपासणी या तंत्राद्वारे विकसित झाली आहे.


आपल्या देशात कृषी व्यवस्था फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कोणताही देश हा उद्योगांवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही उद्योग चालवण्यासाठी कच्चा माल हा कृषी माध्यमांतून तयार केला जातो. सुरुवातीपासूनच आपल्या मानवांसाठी शेतीची ओळख हि मूलभूत गरज आहे. म्हणूनच बरेच उद्योग शेतीवर आधारित आहेत. शेतीत नविन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन  अल्प कालावधीत काम झाल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच कामाचा फायदा होतो. शेती करण्यासाठी आपण ट्रॅक्टर, हारवेस्टर, सिंचन प्रणाली वापरत आहोत. या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात बराच फायदा होत आहे.


माहिती तंत्रज्ञानाचे तोटे आणि गैरवापर

तंत्रज्ञानाने आपले कार्य सोपे केले आहे, परंतु त्यामध्ये आपण काही सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या मेंदूवर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा प्रभाव पडतो, आपण तंत्रज्ञान कश्याप्रकारे वापरतो त्यावर हे अवलंबून आहे. जर तंत्रज्ञानाचा वापर संतुलित पद्धतीने केला गेला तर तो खूप फायदेशीर आहे.  तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ एका हद्दीतच केला गेला पाहिजे, जर आपण या मर्यादा ओलांडल्या तर तंत्रज्ञान आपल्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.


आजकाल लोक अगदी लहान कामे करण्यासाठीही तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत, ज्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये सुस्तपणाचा कल वाढत आहे.


तंत्रज्ञानामुळे एका चुकीमुळे बर्‍याच लोकांची खासगी आणि गोपनीय माहिती सार्वजनिक होऊ शकते. ही माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचल्यास ते लोकं चुकीचा वापर करू शकतात. बरेच लोक नकारात्मक हेतूसाठी तंत्रज्ञान वापरतात.


आजकाल हॅकर्स आपल्या इंटरनेट बँकेला हॅक करुन  बँक खात्यातून पैसे काढून घेतात. अशा बातम्या येत असतात. काही चोर एटीएम कार्ड बदलून, क्लोन बनवून आपले पैसे चोरतात. अशाप्रकारे तंत्रज्ञानामुळे आपल्या समस्याही वाढल्या आहेत.  बनावट कॉल करून परेशान करतात. तुमचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड, ओटीपी नंबर विचारतात.


तंत्रज्ञानामुळे जितके आपले आयुष्य सोयीस्कर झाले आहे तितकेच आपले आरोग्य बिघडवण्यामध्येही मोठे योगदान आहे.  संगणक आणि स्मार्टफोनचा जास्त प्रमाणात वापर केल्याने झोपेची समस्या, तणाव आणि डोळ्यांची कमजोरी यासारखे आरोग्याशी संबंधित अनेक दुष्परिणाम होऊ लागले आहेत.


असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे तंत्रज्ञानाने स्थान दिले नाही. आजच्या लेखात आम्ही आपल्याला तंत्रज्ञानाचे बरेच फायदे आणि तोटे सांगितले आहेत. आपण सर्वांनी मानवी हितासाठी विचारपूर्वक याचा उपयोग केला पाहिजे.


मला आशा आहे की, आपल्याला महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे - advantages and disadvantages of information technology in marathi याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻


➡️ डिजिटल इंडिया मराठी निबंध

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने