एरोप्लेन मोड काय आहे? What is Aeroplane mode in marathi?

Airplane mode information in marathi

मोबाईल हि टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपण जे मोबाईल वापरतो त्यात खूप जास्त फिचर्स आहेत. त्या फिचर बद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. असेच एक महत्त्वाचे उपयोगी फीचर आहे. ज्याचे नाव आहे आहे एरोप्लेन मोड (Aeroplane mode). हे फीचर सर्वच डिव्हाइस मध्ये उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच या ऑप्शन ला आपल्या मोबाईल मध्ये पाहिले असेल. जर आपण विमानाने प्रवास केला असेल तर या ऑप्शन ला आपण नक्कीच वापरले असेल. आपल्यापैकी बर्‍याच लोकांना या ऑप्शन बद्दल कल्पना नाही आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण एरोप्लेन मोड काय आहे? Airplane mode information in marathi एरोप्लेन मोड कश्यासाठी वापरतात? त्याचा उपयोग काय आहे? याबद्दल पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया...


एरोप्लेन मोड काय आहे?


एरोप्लेन मोड काय आहे? What is Aeroplane mode in marathi?

Airplane mode आणि Flight Mode हे दोन्ही एकच आहेत. एरोप्लेन मोड हे आपल्या डिव्हाइस मधील वायरलेस ट्रान्समिशन सेवा संपूर्णपणे बंद करते. जसे की कॉल, वाईफाई, ब्लूटूथ, मोबाईल डाटा. काही डिव्हाइसमध्ये एरोप्लेन मोड चालू असताना देखील आपण वाईफाई आणि ब्लूटूथ वापरू शकतो. एरोप्लेन मोड प्रामुख्याने यासाठी बनवलेले आहे की, जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो त्यावेळेस आपल्या डिव्हाइस ला सुरक्षित ठेवण्याचे काम एरोप्लेन मोड करते. कारण आपल्या फोनमध्ये जे सिग्नल येतात ते रेडिओ विद्युत चुंबकीय हस्तक्षेप सोडतात. यामुळे विमानाच्या equipments वर अडथळा निर्माण होऊ शकतो. फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या मते, जमिनीवर असलेल्या टॉवर्सची सेवा बाधित होऊ शकते.

एरोप्लेन मोड कश्यासाठी वापरतात?

एक मल्टिमीडिया फोन किंवा स्मार्टफोन नेहमी सेल टॉवर सोबत कनेक्ट करत असतो. नेटवर्क टॉवर फार दूर असेल तर आपल्या फोन ला सिग्नल Boost करावे लागते. जेणेकरून ते टॉवर्सशी योग्यरित्या संवाद साधू शकतील. याच कम्युनिकेशन मुळे विमानाच्या नेव्हिगेशन मध्ये बर्‍याच समस्या निर्माण होऊ शकतात. असे अडथळे निर्माण होऊ नये म्हणुन सरकारने एरोप्लेन मोड वापरण्यासाठी सांगितले आहे.

विमानात मोबाईल बंद किंवा एरोप्लेन मोड मध्ये नाही केला तर काय होईल?

विमानात प्रवास करताना मोबाईल बंद किंवा एरोप्लेन मोड मध्ये नाही केला तर विमानाच्या सेंसर आणि नेविगेशन सिस्टम मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे पायलटला विमान चालविण्यास अडचण येऊ शकते, म्हणूनच आपल्याला विमानात फोन बंद करावा किंवा मोबाईलमध्ये एरोप्लेन मोड चालू करायला सांगितले जाते जेणेकरून पायलटला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.

जर आपण विमानामध्ये फोन बंद केला नाही किंवा फोन बंद करणे विसरलात तर घाबरू नका, यामुळे विमान क्रॅश हि होणार नाही किंवा विमान खाली हि पडणार नाही, यामधे तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण विमानात फोन बंद किंवा एरोप्लेन मोड मध्ये करू नये. आपण विमानाने प्रवास करत असाल तर प्रत्येक नागरिकाने फोन बंद केलाच पाहिजे. असे नाही केले तर पायलटला अडचण येऊ शकते.

एरोप्लेन मोड चालू केल्यानंतर आपण आपल्या डिव्हाइस मध्ये एप्लिकेशन, व्हिडिओ, संगीत आणि इतर माहिती वापरू शकतो. विमानामध्ये एअरलाइन्सद्वारा त्यांच्या प्रवाश्यांसाठी वायफाय लावलेले असतात. यामुळे प्रवासी इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकतात.

एरोप्लेन मोड वापरण्याचे फायदे

* एरोप्लेन मोड वापरल्याने आपण आपल्या फोन चि बॅटरी सेव्ह करू शकतो.

* जेव्हा आपण फोन चार्जिंग ला लावता त्यावेळी फोन एरोप्लेन मोड मध्ये करुन लावला पाहिजे. कारण एरोप्लेन मोड मध्ये फोन असेल तर आपल्या फोन मधून जे radios निघतात ते बंद होतात. आणि आपल्या फोनचे नेटवर्क पण बंद होते ज्यामुळे कोणताही प्रकारचे नोटिफिकेशन येणार नाही. ज्यामुळे आपला फोन लवकर चार्ज होईल.

* आपण मिटिंग मध्ये असाल तर आपण एरोप्लेन मोड वापरू शकता. यामुळे आपल्याला कोणतेही कॉल, मॅसेजेस येणार नाही.


मला आशा आहे की, आपल्याला एरोप्लेन मोड काय आहे? What is Aeroplane mode in marathi? याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला एरोप्लेन मोड कश्यासाठी वापरतात? हे समजलेच असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक, आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने