विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध - Vidnyan Shap Ki Vardan Marathi Niband

Vidnyan Shap Ki Vardan essay in marathi मित्रांनो आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. हे युग विज्ञानाने परिपूर्ण बनले आहे. जेव्हा प्राचीन काळामध्ये अशक्य मानल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या आजच्या युगामध्ये विज्ञानाने शक्य केल्या आहेत. आजच्या आपल्या सर्व जीवनावर विज्ञानाने इतका प्रभाव पाडला आहे की, आपण याची कल्पनाही करू शकत नाही. परंतू आपण हे देखील पाहतो की अनियंत्रित वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नक्कीच अश्या परिस्थितीत विज्ञान शाप की वरदान हा प्रश्न उभा राहतो. म्हणूनच या पोस्टमध्ये आपण विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध - Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh, विज्ञानाचे फायदे व तोटे, विज्ञान म्हणजे काय?, विज्ञानाचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध - Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh


विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध - Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh

या युगात विज्ञान हे आपल्या जीवनाशी निगडित महत्वाचे वरदान ठरले आहे. आपल्या आजच्या मानवी जीवनात विज्ञानाने चांगला परिणाम घडविला आहे. विज्ञानामुळे बारीक सुईपासून ते उंच असलेल्या आभाळातील अंतर मोजणे शक्य झाले आहे. आज मानवी जीवनात ज्या क्रिया घडत आहेत त्या केवळ विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत.

विज्ञान म्हणजे काय? What is science in marathi

विज्ञान (science) म्हणजे एखादया कोणत्याही वस्तू किंवा विषयाबद्दल संपूर्ण, विशिष्ट आणि पद्धतशीर ज्ञान असणे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान आणि ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. आजपर्यंत घडलेले विविध प्रकारचे कार्य आणि नवीन कल्पनांना शोधणे हे विज्ञानाचेच परिणाम आहेत.

विज्ञान मराठी माहिती

लॅटिन भाषेतील सायन्शिया (Scientia) या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे. प्रचलित वापरानुसार या शब्दाचा अर्थ विशिष्ट प्रकारचे ज्ञान असा होतो.

आपण 28 फेब्रुवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळतो. या विज्ञानाने संपूर्ण जगाला एक कुटुंब बनविले आहे. विज्ञानाचे महत्व एवढे आहे की, या जगामध्ये असे कोणतेही ठिकाण नाही जेथे विज्ञानाने बनविलेले उपकरण किंवा शोध उपलब्ध नाहीत.

विज्ञानाचे महत्व - विज्ञानाचे फायदे व तोटे

विज्ञानाचे फायदे

विज्ञानाचे वरदान: विज्ञानाचे वरदान अमर्यादित आहेत.
▪ विज्ञानाने अंधारावर प्रकाश निर्माण करुन विद्युत शास्त्राची ओळख संपूर्ण जगाला करुन दिली आहे. आपण पाहिले तर आजच्या जगात प्रत्येक जागी विज वापरली जाते. विचार करा विज नसेल तर काय होईल?

▪ विज्ञानाचे महत्व आपल्या जीवनात इतके महत्त्वपूर्ण झाले आहे की, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेत असताना पर्यंतच्या सर्व क्रिया विज्ञानाने प्रदान केलेल्या साधनांच्या आधारे केल्या जातात.

▪ आजच्या आधुनिक युगात विज्ञानाने सर्व गोष्टी शक्य केल्या आहेत. आपण विज्ञानाच्या मदतीने बटन दाबून कार्य करू शकतो.

▪️ दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या सुविधा
विज्ञानामुळे आपल्या मनुष्याच्या सुखसोयी वाढल्या आहेत. आपण घालतो ते कपडे धोण्यासाठी वॉशिंग मशीन, हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी हिटर, अन्न शिजवण्यासाठी गॅस, उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी फ्रीज, प्रकाशासाठी लाईट, थंड हवेसाठी पंखा-कुलर-एसी, मनोरंजनासाठी टीव्ही-रेडिओ, बाहेर फिरण्यासाठी गाडी यांसारख्या बऱ्याच गोष्टी या विज्ञानामुळे आपल्यासाठी वरदान बनल्या आहेत. आज यांवर सर्व औद्योगिक प्रगती अवलंबून आहे.


वाचा➡️विज्ञानाचे महत्त्व निबंध

➡️इंटरनेट शाप की वरदान निबंध मराठी


▪️विज्ञानाने वायरलेस संप्रेषण क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडविली आहे. आज आपण आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल फोन, संगणक, इंटरनेट, टेलिप्रिंट फॅक्स या उपकरणांच्या मदतीने जगाच्या एका कोपऱ्यातून काही सेकंदात जगाच्या दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यात संपर्क साधू शकतो. हे आपल्या मानवी जीवनासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. असे अगणित चमत्कार विज्ञानाने घडवून आणले आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 

▪ विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. असाध्य होणाऱ्या भयंकर आणि संसर्गजन्य रोगांवर उपचार करणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्यामुळे आपले जीवन सुखी बनवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.  शरीरातील सूक्ष्म सूक्ष्म रोगांचे तत्वज्ञान एक्स-रे द्वारे सहजतेने केले जाते. तसेच अँजिओग्राफी, सिटी स्‍कैन या चाचण्यांव्दारे शरीरातील रोग सहज ओळखता येतात. कोरोना सारख्या गंभीर रोगावर विज्ञान लवकरच लसींचा शोध लावून संपूर्ण जगाला कोरोनामुक्त करेल.

▪ कृषी क्षेत्रात विज्ञानाने अनेक उपकरणे तयार करुन आपला दर्जा कायम ठेवला आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. या आपल्या देशात शेती  करण्यासाठी शेतकऱ्याला चांगले बियाणे, खत, कीटकनाशके, ट्रॅक्टर, शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे उपकरणे, शेतीला पाणी हवे असण्यासाठी बोर मशीन अश्या सर्व गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत.

▪  शिक्षण क्षेत्रात विज्ञानाचा अभूतपूर्व वाटा आहे. मुद्रण यंत्राच्या शोधामुळे मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित करणे शक्य झाले आहे. छपाई क्षेत्रामुळे वर्तमानपत्रे लोकांच्या घरांघरात पोहचली. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या मदतीने शिक्षणाच्या प्रचारास मोठी मदत झाली आहे. संगणकाच्या विकासाने या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली आहे.

▪ या औद्योगिक क्षेत्रात विज्ञानाने तयार केलेल्या मोठ मोठ्या मशीन निर्मितीमुळे कारखान्यांना, कंपन्यांना चालना मिळाली आहे. या मशीनमुळे कमी मनुष्यबळ, वेळेची बचत आणि जास्त उत्पादन होण्यास मदत झाली.

▪  वाहन क्षेत्रात विज्ञानाने अमर्यादित कार्य केले आहे. आपल्याला माहीतच असेल प्राचीन काळामध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्या काळात माणसांना लांबचा प्रवास करण्यासाठी बरेच महिने लागत असत. पण आताच्या काळात आपल्याला प्रवास करण्यासाठी रेल्वे, विमान, गाडी, मोटर, हेलिकॉप्टर, जहाज या गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या मानवाने या युगात विज्ञानाच्या माध्यमातून चंद्रावर विजय मिळवला आहे आणि तो आता मंगळावर विजय मिळविण्याच्या तयारीत आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

▪  विज्ञानाने निसर्गावर प्रचंड प्रभाव पाडला आहे. आज विज्ञानाचा प्रभाव असा आहे की, आकाश आणि पातळ यांचे रहस्य एक-एक करुन उघडकीस आणले जात आहे.

▪ मनोरंजन क्षेत्रात विज्ञान हे खरोखर वरदान ठरले आहे. विज्ञानाने आपल्यासाठी अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन दिली आहेत. जसे की, डिश वरील वेगवेगळे चॅनल्स, चित्रपट, व्हिडिओ गेम, रेडिओ, अश्या विविध वाहिन्यांमधून आपल्याला पाहिजे असलेले कार्यक्रम आपण पाहून मनोरंजन करत असतो.

विज्ञानाचे तोटे

एकीकडे पाहिले तर विज्ञानाने या युगात मनुष्याला उपयुक्त असणाऱ्या अनेक सुविधा प्रदान केल्या आहेत आणि दुसरीकडे तोफा, बॉम्ब, क्षेपणास्त्रे, विषारी वायू आणि परमाणू उपकरण यांच्यासारख्या विध्वंसक आविष्कारांनी मानवी जीवनाला विनाशाच्या मार्गावर आणले आहे.आजच्या काळात संपूर्ण जग बॉम्ब व क्षेपणास्त्रांच्या भीतीने थरथर कापत आहे. या सर्वांमुळे प्रदूषण वाढले आहे आणि वातावरणातील ओझोन क्षेत्राचे पण नुकसान झाले आहे.

▪ विज्ञानाच्या औद्योगिक प्रगतीमुळे पर्यावरणीय प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.  तसेच, वायू गळतीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

▪ विज्ञानामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या नवीन गोष्टींमुळे मानवी वातावरणात असंतुलन दुष्परिणाम घडत आहेत. अधिक सुविधांमुळे माणूस आळशी बनत आहे. ज्यामुळे त्याचे शारीरिक सामर्थ्य क्षीण होत चालले आहे. यामुळे बरेच नवीन आजारही उद्भवत आहेत.

▪  विज्ञानाने आपल्याला वेगवान वाहने दिली आहेत. या वाहनांच्या अपघातामुळे दररोज हजारो लोक रस्त्यावर आपला जीव गमावतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते पूर्णपणे विस्कळीत होत आहेत आणि त्यांच्यामधून निघणारे ध्वनिप्रदूषण मानवी आरोग्याला न्यूरोलॉजिकल रोगांचे वितरण करीत आहेत.

▪  आजच्या विज्ञानाने मानवी आयुष्याला धोक्यांनी भरलेले आहे. विज्ञानाच्या वरदनामुळे आपल्या मानवांना सुखाची साधने उपलब्ध करुन दिली आहेत. वीज ही विज्ञानाची चमत्कारिक देणगी आहे. पण याच विजेच्या एका झटक्या मुळे माणसाचे आयुष्य जाते.

▪ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, विज्ञान हे प्रचंड शक्तिशाली आहे. आपल्या इच्छेनुसार आपण त्याचा उपयोग करू शकतो. परंतू जेव्हा आपल्या काही मानवांमध्ये राक्षसी आवृत्ती अस्तित्वात येते तेव्हा विज्ञानाची शक्ती विध्वंसक हिंसक शक्तीचे रूप धारण करते. विध्वंसक पद्धतीने अनेक नुकसान केले जाऊ शकते.

खरं तर या जीवनात विज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. विज्ञान हे मानवांसाठी एकीकडे वरदान आहे तर दुसरीकडे शाप. पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण विज्ञानाचा वापर कश्याप्रकारे करत आहोत.

विज्ञानाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात केला जात आहे. आजच्या काळात असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे विज्ञान वापरले जात नाही. आपल्याला असे म्हणता येईल की, आपल्या मानवी जीवनासाठी विज्ञानाशिवय दुसरे कोणतेही वरदान नाही.


मला आशा आहे की, आपल्याला विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध - Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh, विज्ञानाचे फायदे व तोटे, विज्ञान म्हणजे काय?, विज्ञानाचे महत्व याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻 


वाचा

➡️महिती तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञानाची किमया 

➡️महिती तंत्रज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे 

➡️इंटरनेट नसते तर मराठी निबंध

➡️मोबाईल नसता तर मराठी निबंध

➡️नरेंद्र मोदी निबंध मराठी


3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने